वारी पंढरीची वारी आरोग्याची

वारी पंढरीची वारी आरोग्याची

     उन्हाळ्यामध्ये ऊन, नकोसा झालेला घाम आणि या सगळ्यामधे महाराष्ट्राला एक ओढ लागलेली असते. ती अशी असते - 
"सकळ तीर्थाहूनी पंढरी मुकुटमणी 
काय सांगू तेथील शोभा, रमावल्लभ जेथे उभा"
       पाऊस पडायला सुरुवात होते, साधारणत शेतातील काम थोडी थोडी आटोपली असतात. आणि उभा महाराष्ट्र वाट बघत असतो ती आषाढी वारीची. आपल्याकडे वारी ही एक परंपरा आहे आणि ही वारीची जी परंपरा आहे ती साधारणतः एक हजार वर्षांपूर्वी सुरू झाली आहे. माऊली अर्थात संत ज्ञानेश्वर यांच्या घरी पूर्वापार अशी पिढी होती की या दिवसांमधे आपेगाव या त्यांच्या गावातून या पादुका विठ्ठलाच्या भेटीला ते घेऊन जात असत. आणि ती परंपरा पुढे भागवत किंवा वारकरी परंपरेत आली आहे. आणि या वर्षी 29 जून पासून ही वारी सुरू होत आहे.
         ही वारी कशासाठी? वारी का करायची? वारीमध्ये काय मिळत? आणि यामध्ये जेथे वारीचा शेवट असतो तो असतो आषाढी एकादशी. तर ही आषाढी एकादशी का आली? आषाढी एकादशी का करायची? कशासाठी करायची? वारी मध्ये हे वारकरी काय घेऊन जात असतात? ते भजन, टाळ, मृदंग, कीर्तन, पावली हे सगळ नेमक कशासाठी आहे? या सगळ्याचा आढावा, मागोवा आणि त्याचा आनंद या निमित्ताने आपण "वारी आरोग्याची" या सदरामध्ये घेणार आहोत.

https://www.facebook.com/profile.php?id=61561650989734&mibextid=ZbWKwL